हॅलो महाराष्ट्र । सण-उत्सवांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय रेल्वे 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सणासुदीच्या काळात 200 स्पेशल गाड्या चालवण्याचा विचार करीत आहे, असे गुरुवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव यांनी सांगितले. यादव म्हणाले की, या उत्सवाच्या हंगामात रेल्वे 200 हून अधिक फेस्टिव्हल स्पेशल गाड्या चालवणार आहे. त्याचबरोबर, गरज भासल्यास किंवा जास्त मागणी असल्यास या स्पेशल गाड्यांची संख्या वाढविलीही जाऊ शकते.
12 सप्टेंबरपासून रेल्वेने 80 जादा गाड्या चालवल्या असून त्यांना क्लोन ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. यादव म्हणाले की, आम्ही विविध विभागांच्या महाव्यवस्थापकांशी बैठक घेतली असून त्यांनी स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या स्थितीचा आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे आणि सणासुदीच्या कालावधीत किती विशेष गाड्या चालवल्या ज्याव्यात यावर निर्णय घेण्यात येईल.
राज्य सरकारच्या गरजा आणि साथीच्या परिस्थितीचा विचार करता रेल्वेने प्रवासी सुविधांचा दररोज आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यादव म्हणाले की, जोपर्यंत प्रवासी गाड्यांचा प्रश्न आहे, आम्ही दररोज गाड्यांची गरज, रहदारी आणि कोविड १९ च्या परिस्थितीचा आढावा घेऊ. जेथे जेथे आवश्यकता असेल तेथे आम्ही ज्यादा गाड्या चालवू.
क्लोन केलेल्या गाड्यांबाबत यादव म्हणाले की, ऑक्युपेंसी जवळपास 60 टक्के आहे. या गाड्या जास्त मागणी असलेल्या मार्गावर चालविण्यात आलेल्या आहेत. रेल्वेचा प्रयत्न आहे कि, ज्याठिकाणी मोठी वेटिंग लिस्ट असेल त्याठिकाणी क्लोन ट्रेन चालवली जाईल. रेल्वेने असेही ठरवले आहे की जिथे जिथे क्लोन ट्रेन भरली जाईल तेथे त्या मार्गावर आणखी एक क्लोन ट्रेन चालविली जाईल जेणेकरून प्रवास्यांना वेटिंग लिस्टची वाट पाहावी लागणार नाही.
त्यांनी सांगितले की सणासुदीच्या काळात प्रत्येक व्यस्त मार्गावर एक ते दोन क्लोन गाड्या चालवल्या जातील. रेल्वेने सध्या केवळ 40 क्लोन गाड्या चालवल्या आहेत. याशिवाय सणासुदीच्या म्हणजेच दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस हि देखील ट्रॅकवर धावू शकते. IRCTC ने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.