मुंबई । भायखळा रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण केलेल्या हेरिटेज इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दानवे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी मुंबईतील AC लोकलचे भाडे 50 टक्क्यांनी कमी करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
या घोषणेनंतर आता पाच किलोमीटर अंतराचे किमान भाडे 65 रुपयांवरून 30 रुपये होणार आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, मुंबईतील AC लोकलचे भाडे कमी व्हावे अशी जनतेकडून अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. सध्या असलेले भाडे किमान 20-30 टक्क्यांनी कमी करण्याच्या सूचना त्यांना मिळाल्या आहेत.
मात्र ही भाडे कपात कधीपासून लागू होणार याबाबत दानवे यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. हे लक्षात घ्या कि, मध्य आणि पश्चिम रेल्वे कडून दररोज सुमारे 80 AC लोकल ट्रेन सेवा चालवली जाते.