डीव्हिलियर्स दांपत्याकडे ‘गूड न्युज’; अनुष्का शर्माने दिल्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स हा तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी डॅनियल डिव्हिलियर्स हिने गरोदर असल्याचा फोटो शेअर करत सर्वाना ही गोड बातमी दिली. डॅनियलने मंगळवारी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ‘हॅलो बेबी गर्ल’ असे कॅप्शन लिहिले. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला.

कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स हे दोघे IPLमध्ये बंगळुरू संघाकडून अनेक वर्ष खेळत आहेत. त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री आहे. या दोघांच्या पत्नीदेखील चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही एबी डिव्हिलियर्स आणि डॅनियल या दोघांचे अभिनंदन केले. ‘अभिनंदन डॅनिएल आणि एबी! तुम्ही खूपच आनंदाची बातमी दिलीत’. अशी कमेंट अनुष्काने केली.

डीव्हिलियर्स आणि डॅनियल यांचा प्रेमविवाह आहे. पाच वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर २०१२ मध्ये डीव्हिलियर्सने गर्लफ्रेंड डॅनियल स्वार्ट हिला प्रपोज केलं. या दोघांनी मार्च २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतच भव्य दिव्य लग्नसोहळा केला.