वेळेचा सदुपयोग ! होम क्वारंटाइन केलेले ऊसतोड मजूर करत आहेत वृक्ष संवर्धन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

तब्बल दीड महिन्यापासून चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे घराघरात बसलेल्या व्यक्तींना उद्योग नसल्याने ते वैतागले आहेत व त्यांचा वेळ जात नसल्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आज आपण ऐकत आहोत. त्यातून त्यांना नैराश्य येत असल्याच्या बातम्या ही येत आहेत. समजा तुम्ही स्वतःच्या गावात व त्यातही जिल्हा परिषद शाळेमध्ये होम क्वारंटाईन केले आहात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल ?त्या ठिकाणी ना दूरदर्शन संच ना मनोरंजनाचे साधन. १४ दिवस कसा वेळ व्यतीत करणार हा तुमच्या पुढे मोठा प्रश्न असणार .

कल्पनेनेच थरकाप उडत असला तरी तुमच्या अंगामध्ये काबाड कष्ट करण्याची प्रवृत्ती असेल तर याही परिस्थितीत तुम्ही वेळ सुयोग्य पद्धतीने व्यतीत करू शकता आणि त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद ही समाधान देणारा असेल. हो असंच काहीतरी घडले आहे पाथरी तालुक्यातील वडी गावामध्ये याठिकाणी ऊसतोडीसाठी गेलेले मजूर गावात आल्यानंतर त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. गाव उपक्रमशील असल्याने याठिकाणी मागील काही वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आला आहे. आता या ऊसतोड कामगार यांनी या वृक्षांना संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे .त्यामुळे काम केल्याचे समाधान व वृक्ष संवर्धनाची व निसर्ग जोपासण्याची त्यांना जणू संधी मिळाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडी येथील जिल्हा परिषद शाळेत गावातील ऊसतोड मजूर कामगारांना होम क्वारंटाइन करण्यात आले .रोज काब्बाड कष्ट करण्याची सवय असल्याने आणि त्यांना स्वस्त बसवत नसल्यानी त्यांनी स्वंय प्रेरणेतून शाळा परिसरात लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सर्व झाडांची अंतर्गत मशागत करून झाडाचे आळे खोदकाम करून, त्यांना पाणी देणे, परिसर स्वच्छ करून, काडी कचरा नष्ट करुन परिसरात येणार्‍या उपद्रवी वानरांनाही प्रतिबंध केला असुन शाळा परिसर रोज सकाळी व संध्याकाळी स्वच्छता मोहीम अभियान राबविले जात आहे. एवढेच नाही तर परिसरात उघड्यावर देखील शौचालयचा येणार्‍या प्रतिबंध करत आहेत.

यामध्ये ऊसटोळी मुकादम दत्ता शिंदे यांच्यासह रंजित होळकर, अरुण देशमुख,देविदास होळकर, त्रिंबक खेत्री,संजय होळकर,बाबासाहेब थोरात, यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिला देखील स्वयंपाक पाणी आटोपल्या नंतर परिसरात खूरपण्याने निंदणी करणे,सडा सारवरण करणे आदी काम सोशल डिस्टान्सिंगचे नियम पाळत सुरक्षित अंतर ठेवून करत आहेत.

त्यांच्या या कामाचे आता ग्रामस्थ कौतुक करत आहेत. आता इतरही होम क्वांरटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींनी हा आदर्श घेतल्यास हे १४ दिवस म्हणजे आयुष्यातील आठवणी दिवस होण्यास नक्कीच मदत होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.