Google Pay, PhonePe, Paytm वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; नव्या वर्षात बदलले ‘हे’ नियम

UPI rules changed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI द्वारे आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची मर्यादा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने 5 पट वाढवलेली असल्याने बँक ग्राहक ऑनलाईन पेमेंट मोठ्या प्रमाणात करू शकणार आहेत. भारतात ऑनलाईन पेमेंट करण्यास किंवा कॅशलेस व्यवहार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक ग्राहकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन पेमेंट होऊ लागले. पूर्वी बँक ग्राहकांना बँकेत रांगा लावून, वेळ खर्च करून आपलेच पैसे काढण्यासाठी मानसिक, शारिरीक त्रास होत असे. त्यांचा हा त्रास वाचण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल पेमेंट सुरु करण्याचा निर्णय घेतला. कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देताना पूर्वीचे युपीआयचे नियम आता सरकारने बदलले असून यामुळे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या बँक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करणाऱ्या बँक ग्राहकांचे अनेक त्रास वाचले जातात. यामुळे अनेकांचा कॅशलेस व्यवहार करण्याचा ओघ वाढला आहे. युपीआयद्वारे डिजिटल रक्कम दुसऱ्या व्यक्तीला पाठवण्याची सुविधा सोपी आणि कमी वेळेत होणारी आहे. मार्केटमध्ये यासाठी विविध प्रकारचे डिजिटल पेमेंट करू देणारे एप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. सध्या भारतात ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी गुगल पे, पेटीएम, फोन पे इ. अनेक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. या एप्लीकेशन्सचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने या वर्षीपासून म्हणजे 1 जानेवारी २०२४ पासून युपीआय पेमेंटबाबत नियम बदलले आहेत. अर्थात हे नियम बँक ग्राहकांना आनंद देणारे आहेत. तर काय आहेत हे 5 नियम ? आणि यामुळे ऑनलाईन पेमेंट करण्यावर याचे काय परिणाम होणार आहेत, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

नियम क्र. 1 : नवीन नंबर असेल तर ज्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनद्वारे बँक ग्राहक ऑनलाईन पेमेंट करणार आहे उदा. गुगल पे, भीम , त्यावर युपीआय UPI मार्फत नवीन नंबरवर 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यावर हे पेमेंट 4 तासानंतर मिळणार असा नवीन नियम आला आहे. ज्या व्यक्तीला रक्कम पाठवली आहे, ती या वेळेत थांबवता येईल किंवा वाढवता येणार आहे. यामुळे बँक ग्राहकाला रक्कम पाठविण्याबाबत योग्य विचार करायला वेळ मिळणार आहे.

नियम क्र. 2 : दुसऱ्या नियमाद्वारे, UPI मार्फत पाठविणाऱ्या रकमेत कमाल 5 लाख रुपये रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या अगोदर रकमेची मर्यादा 1 लाख रुपये होती. आता त्यात 5 पट वाढ झाल्याने बँक ग्राहक खुशीत आहेत. मात्र शिक्षण संस्था आणि रुग्णालये यांसाठी ही सुविधा निश्चित करण्यात आली आहे.

नियम क्र. 3 : NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने नवीन वर्षापासून UPI मार्फत बँक ग्राहकाला ऑनलाइन पेमेंट करण्याची मर्यादा दररोज 1 लाख रूपये अशी निश्चित केली आहे.

नियम क्र. 4 : ऑनलाईन पेमेंट करताना UPI मार्फत SIP , विमा प्रीमियम आणि इतर बँकिंग पेमेंट करण्याची मर्यादा पूर्वी 15,000 रुपये होती. ती 1 लाख रुपयांपर्यंत केली आहे. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या बँक ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

नियम क्र. 5 : ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या बँक ग्राहकाच्या खात्यात पैसे उपलब्ध नाहीत, त्यावेळी UPI Now मार्फत काही मर्यादित रक्कम देण्यात येणार आहे. बिनव्याजी आणि 45 दिवस ही रक्कम वापरता येणार आहे. UPI Now मार्फत हा बँक ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.