गृहमंत्री चिल्लर गोळा करतात आणि डॉलर पवारांना देतात; पडळकरांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत. राज्याचे गृहमंत्री  चिल्लर गोळा करतात आणि डॉलर पवारांना देतात असा आरोप पडळकरांनी केला आहे. चिल्लर खाऊन डॉलर पवारांकडे देणाऱ्यालाच राष्ट्रवादीत गृहमंत्री करतात असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस ही जगातील एकमेव प्रायव्हेट लिमीटेड पार्टी आहे.या पार्टीत चिल्लर खाऊन डॉलरचा हिशोब सुप्रिया ताईंना देणाराच गृहमंत्री होतो. त्यांचे सरकार असताना एक एपीआय १०० कोटींची वसुली करतो. आता त्यांच्या गृहमंत्र्यांना आता तोंड लपवावे लागत फिरावे लागत आहे अशा शब्दांत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर हल्लाबोल केला.

अजित पवार नोटांचा हिशोब देत नाहीत म्हणून त्यांनाही गृहमंत्री पद मिळत नाही.१९९९ पासून पवारांनी गरीब तोंडाचेच गृहमंत्री केलेत. आता वळसे पाटलांचा नंबर लागला आहे.त्यांनी जपून रहावे. जास्त भानगडी करु नयेत.परिवहन मंत्र्यांना ईडीची नोटीस आली आहे.भ्रष्टाचारी राष्ट्रवादीचा घडा भरत आला असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment