राज्यावरचं हे संकट टळो, महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीसांच्या सक्षम हातात यावं; पडळकरांच सिद्धिविनायकाला साकडं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे भाजपकडूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या व शिंदे गटासोबत जाण्यासाठीची तयारी केली जात आहे. या दरम्यान आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले असून “बहुजन समाज, सामान्य जनता, व्यापारी, शेतकरी या भ्रष्टाचाराच्या वणव्यात होरपळून निघाले. राज्यावरचं हे संकट टळो, महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीस यांच्या सक्षम हातात यावं,” असं साकडं पडळकर यांनी घातले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आज मुंबईत जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दर्शनही घेतले. त्यानंतर ट्विट करत त्यांनी म्हंटले आहे की, “गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाताहत झाली. बहुजन समाज, सामान्य जनता, व्यापारी, शेतकरी या भ्रष्टाचाराच्या वणव्यात होरपळून निघाले. राज्यावरचे हे संकट टळो, महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सक्षम हातात याव, असे साकडे त्यांनी घातले आहे.

गोपीचंद पडळकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबियांवर अनेकवेळा काही ना काही कारणांनी टीका करण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. आता फडणवीस यांच्या जवळचे असलेल्या पडकरांनी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सिद्धिविनायकाला साकडे घातले आहे.