आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढून प्रेस घेतली होती का ? पडळकरांची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात 1 मे पासून कोरोना प्रतिंबधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारने यापूर्वी सांगितले होते. मात्र, काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना 1 मे पासून पुरेशा लसींअभावी लसीकरणाची मोहीम राबवता येणार नाही असे सांगितले होते यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टोपेंवर कडक शब्दात टीका केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढून प्रेस घेतली होती का ? असा सवाल त्यांनी केला.

काल सकाळी राज्याच्या पालकमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? यांना उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. यांना कोणताही अजेंडा नसताना हे तिघे एकत्र आले आहेत,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. मात्र, भाजपचं काम चांगलं असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचं जिरवण्याचं काम मात्र या सरकारने केलं आहे,” असा टोला पडळकर यांनी गलावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment