Monday, January 30, 2023

अजित पवारांचा गर्व मोडून काढला ; पडळकरांची तिखट प्रतिक्रिया

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने यश मिळवल्या नंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” अशी तिखट प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा गर्व फोडण्यात आला. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादी नेते त्यांचा उमेदवार 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडी वर निशाणा साधला. महाराष्ट्रात योग्य वेळी सरकारचा, करेक्ट कार्यक्रम करणारच असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी विचाराला आरसा दाखविण्याचा काम पंढरपूरच्या जनतेने केले आहे. या सरकारने कोरोनाच्या कुणालाच मदत केली नाही. सरकारच्या विरोधात नाराजी होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.