हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाकरे सरकारणे नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. तो म्हणजे ESBC च्या निुयक्त्या कायम ठेवायच्या तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविली जाणार. सरकारच्या या निर्णयावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून त्यात ‘महाविकास आघाडी सरकारने SEBC च्या उमेदवारांसाठीचा घेतलेला निर्णय हा फसवा आहे,’ असे पडळकरांनी म्हंटल आहे.
पडळकरांनी त्यांच्या पत्रात म्हंटले आहे कि, “SEBC उमेदवारांना पुर्वलक्ष्यी प्रभावाने अराखीव (OPEN) किंवा EWS मध्ये वर्ग करून दिलासा दिल्याचा आव आणणारा शासन निर्णय मुळातंच भरती प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करणारा आहे. भरती प्रक्रीया न्यायालयीन प्रक्रीयेच्या कचाट्यात सापडून परत गोंधळ निर्माण व्हावा, हीच अपेक्षा.”
SEBC उमेदवारांना पुर्वलक्ष्यी प्रभावाने अराखीव (OPEN) किंवा EWS मध्ये वर्ग करून दिलासा दिल्याचा आव आणणारा शासन निर्णय मुळातंच भरती प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करणारा आहे. भरती प्रक्रीया न्यायालयीन प्रक्रीयेच्या कचाट्यात सापडून परत गोंधळ निर्माण व्हावा, हीच अपेक्षा pic.twitter.com/UtcAwEuL5Z
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 16, 2021
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले जाते. त्यांनी अनेकवेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी पत्र लिहले असून त्यांनी महाविकास आघाडी सरकार व ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.