नवी दिल्ली । बर्ड फ्लूचा धोका पाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 दिवस गाझीपूर कोंबडी बाजार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत बर्ड फ्लूचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही, असेही केजरीवाल म्हणाले. हिंदुस्थान टाइम्स ने जाहीर केलीये आहे कि दिल्लीच्या विविध भागात किमान ६४ पक्ष्यांच्या मृत्युच्या पाश्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा म्हणण्यानुसार, दिल्लीतील मृत पक्ष्यांचे रिपोर्ट नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल सोमवारी येईल.
वृत्तसंथा पीटीआयने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील बर्ड फ्लूच्या वृत्ता बाबत दुजोरा दिलेला आहे. कानपूर प्राणिसंग्रहालयातील दोन मृत जंगली पक्ष्यांमधे बर्ड फ्लू आढळून आला आहे. यांनतर पुढील आदेश येईपर्यंत प्राणी संग्रहालय बंद करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार दिल्ली, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ येथील नमुन्यांचा निकाल अजून आलेला नाही मात्र सामान्य लोकांना या फ्लूच्या संसर्गाविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.