PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत केंद्र सरकारने सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्याचा सरकारचा सध्या कोणताही प्लॅन नाही. हे जाणून घ्या कि, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी ही मदत 2000-2000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाते. फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. मात्र, डिसेंबर 2018 पासूनच ती लागू केली गेली.

PM kisan Samman Nidhi Yojana News: इस राज्य के 65 हजार से ज्यादा किसानों को  नहीं मिलेगी 2000 रुपए की किस्त, कृषि विभाग ने दी एक हफ्ते की मोहलत, ऐसे  देखें अपना नाम

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) अंतर्गत रक्कम वाढवण्याबाबत काही प्रस्ताव आहे का, असा प्रश्न संसदेत विचारला असता, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले कि, सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही. आतापर्यंत या योजनेचे एकूण 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यँत या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

पीएम किसान सम्मान निधि की ताज़ा खबरे हिन्दी में | ब्रेकिंग और लेटेस्ट  न्यूज़ in Hindi - Zee News Hindi

आतापर्यंत किती खर्च झाला ???

हे जाणून घ्या कि, केंद्र सरकारकडून 30 जानेवारी 2023 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 2.24 लाख कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेती आणि संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी मदतीच्या स्वरूपात ही रक्कम दिली जाते. पीएम किसान ही पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे, ज्यामध्ये सर्व पैसे फक्त केंद्राकडूनच दिले जातात. तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश व्यवस्थापन यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला पुरवतात. मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटींची पूर्तता करावी लागते. PM Kisan

PM Kisan eKYC Update, (Last Date 31 August) @ exlink.pmkisan.gov.in

e-KYC करणे बंधनकारक

पीएम किसानसाठी शेतकऱ्यांना दोन प्रकारे केवायसी करता येते. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे घरबसल्या आरामात ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल. याशिवाय, आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊनही KYC करता येऊ शकेल. जर शेतकऱ्याने स्वत: OTP द्वारे ई-केवायसी केले तर यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच जर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन e-KYC केले तर त्यासाठी काही पॅसीए द्यावे लागतील. PM Kisan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा