शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात केली मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून या सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान आज शिंदे -फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारकडून नुकताच याबाबतचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला असून मानधनात वाढ करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या जीआरमध्ये हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे.

30 जून 2022 रोजी हा निर्णय देण्यात आला होता. शिक्षण सेवकाच्या मानधन वाढीबाबत हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच आवश्यक त्या सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Government decisions GR

या संकेतस्थळावर उपलब्ध शासन निर्णय

महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा निर्णय उपलब्ध असून त्याचा संगणक संकेताक 202302071326490521 असा आहे.

Government decisions GR

अशी केली आहे मानधन वाढ

1) प्राथमिक व उच्च प्राथमिकचे मानधन – 6 हजारावरुन 16 हजार

2) माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचे मानधन – 8 हजारावरुन 18 हजार

3) उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक मानधन – 9 हजारावरुन 20 हजार