मासे पकडण्यासाठी गळ टाकला अन् हातात आला बाँम्ब; ATS पथक घटनास्थळी दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) सापडले. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. याला पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/172021018171282

कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये सोमवारी सकाळी काही युवक मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासे पकडण्यासाठी त्या युवकांनी नदीच्या पाण्यामध्ये गळ (जाळी) टाकल्यानंतर त्यांच्या गळाला मासा लागला असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी तो गळ नदीच्या पात्रातून पाण्याबाहेर काढला.त्यावेळी त्यामध्ये ग्रॅनाईट (बॉम्बे) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते अतिशय अवजड असल्याने त्यांना त्याबाबत शंका आली. मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, सापडलेले ग्रॅनाईट सैन्य दलाचे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात असून त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथकाने भेट दिली असून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

मासेमारी करताना सापडलेला 'तो' बाँम्ब अत्यंत धोकादायक; पोलिस अधिक्षकांचा मोठा खुलासा

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment