Tuesday, January 7, 2025

कोरोना काळात ऑनलाईन किराणा स्टोर Grofers च्या नफ्यात झाली वाढ, पुढील वर्षी बाजारात आणणार IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॉफ्टबँक-समर्थित ऑनलाइन किराणा दुकान ग्रॉफर्सची पुढच्या वर्षाच्या अखेरीस इनिशिएशनल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) सुरू करण्याची योजना आहे. यापूर्वी 2022 मध्ये आयपीओ बाजारात आणण्याची कंपनीची योजना होती, परंतु कोरोनाव्हायरस या साथीच्या काळात, व्यवसायात भरभराट झाल्यामुळे आणि नफ्याच्या वाढीमुळे तो आधी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रॉफर्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बिंदर धिंदसा म्हणाले की, कंपनीने जानेवारीत ऑपरेशनल प्रॉफिट कमावला आणि या वर्षाच्या अखेरीस रोखीची स्थिती सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले, जानेवारीत ऑपरेशनल प्रॉफिट मिळविल्यानंतर लॉकडाऊन दरम्यान नफा मिळवण्याच्या प्रक्रियेत वेगाने जात आहोत. आम्ही बाजाराच्या भावना पहात आहोत आणि 2021 अखेर भांडवलाच्या बाजारात प्रवेश करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

6 हजार कोटींचे व्हॅल्युएशन
यापूर्वी 2022 मध्ये आयपीओ आणण्याची कंपनीची योजना होती. गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीला 2,500 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आणि एका अंदाजानुसार ग्रॉफर्सचे व्हॅल्युएशन 6,000 कोटींच्या जवळपास आहे.

कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्रॉफर्सने गेल्या महिन्यात 4.4 कोटी वस्तूंची डिलिव्हरी केली आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 99.7 टक्के अचूकतेणे डिलिव्हरी दिली. मे महिन्याच्या अखेरीस 42 लाख घरांना आपली सेवा दिल्याचा ग्रॉफर्सचा दावा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.