हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाढी वाढवणं (Beard )ही आजकाल फॅशन झाली आहे. तरुण वयातील अनेक मुले दाढी ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु थंडीच्या दिवसात हीच वाढलेली दाढी तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. हिवाळ्यात (Winter) आळशीपणामुळे दाढी न करणे आणि ती वाढवणं यामुळे तुम्हाला बऱ्याच आरोग्यदायी समस्यांना सामोरे जावं लागू शकत. चला याबाबत जाणून घेऊया…
फंगल इंफेक्शन-
दाढी वाढल्यामुळे फंगल इंफेक्शन आणि खाज यांचा तुम्हाला सामना करावा लागेल. जर तुम्ही तुमची दाढी वेळेवर साफ केली नाही किंवा तिच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर यामुळे ओलावा आणि घाणीमुळे फंगल इंफेक्शन होऊ शकते.
दाढीमध्ये कोंडा होऊ शकतो –
जर तुम्ही तुमच्या दाढीकडे दुर्लक्ष केलं आणि ती व्यवस्थित साफ केली नाही तर त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमच्या दाढीमध्ये कोंड्याची समस्या निर्माण होऊ शकते. कोरडी त्वचा आणि दाढीमध्ये वाढलेली घाण यामुळे कोंडा होऊ शकतो.
पुरळ आणि पिंपल्स येण्याची शक्यता-
दाढी वाढवल्याने मुरुम आणि पिंपल्स दोन्ही होऊ शकतात. त्वचेची छिद्रे बंद झाल्यामुळे आणि त्यात घाण साचल्यामुळे असे होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दाढीच्या स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे.