Gujarat, HP Election Results : निवडणुक निकालाचे जलद अपडेट डेलीहंटवर पहा

gujrat and himachal pradesh election result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत नुकतीच विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या राज्यांच्या निवडणुक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलेले आहे. हिमाचल प्रदेशसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले, तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणुक निकालासंबंधीत सर्वात जलद अपडेट पहाण्यासाठी भारतातील नंबर 1 स्थानिक भाषा कन्टेन्ट प्लॅटफॉर्म असलेल्या Dailyhunt सोबत जोडले जा. डेलिहंटवर तुम्हाला सखोल आणि रोमांचक कव्हरेज मिळेल. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यातील राजकीय परिस्थिती आणि नेमकी कोणकोणत्या पक्षात मुख्य लढत आहे याबाबत….

हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस vs भाजप अशी थेट लढत –

विकास आणि डबल इंजिन सरकारचा नारा देत भाजप पुन्हा एकदा हिमाचल मध्ये विजयाची आशा बाळगून आहे तर दुसरीकडे गेल्या दोन वर्षांत अनेक निवडणुकांमध्ये पराभव आणि नऊ राज्ये गमावल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत हिमाचल प्रदेशची सत्ता भाजपकडून काबीज करून घेण्यास काँग्रेस उत्सुक आहे. हिमाचल प्रदेशात 68 मतदारसंघ असून यंदाच्या निवडणुकीत तब्बल 412 उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचल मध्ये यंदा 55 लाखांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

गुजरात सोडण्यासाठी भाजपाने AAP ला दिली ऑफर; मुख्यमंत्री केजरीवालांच्या दाव्याने खळबळ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. भाजपचे निवडणूक चिन्ह “कमळ” ला दिलेले प्रत्येक मत त्यांचे सामर्थ्य वाढवेल, असे म्हणत मोदींनी राज्यातील मतदारांना वैयक्तिक आवाहन केलं आहे. तसेच ‘डबल इंजिन’ सरकार सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहील, असे म्हणत पुन्हा एकदा भाजपला निवडून द्या असं आवाहन त्यांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला केलं. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी वाड्रा यांनी हिमाचल प्रदेश पिंजून काढत अनेक जंगी सभा घेतल्या आहेत. सत्तापालट व्हावा यासाठी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत जातीने लक्ष घातल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत नव्याने उतरलेल्या आम आदमी पक्षाने 67 जागांवर आपले उमेदवार दिले असले तरी हिमाचल प्रदेशात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत पाहायला मिळत आहे.

गुजरातमध्ये काय आहे परिस्थिती?

खरं तर गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा गड मानला जातो. 1995 पासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला 40 टक्के मते मिळत असली तरी दोन दशकांहून अधिक काळ इथे भाजपचीच सत्ता आहे. आत्तापर्यंत गुजरातमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत होती मात्र यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने उडी घेतल्याने गुजरातमध्ये प्रथमच तिरंगी लढत पहायला मिळत आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. 2017 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजप आमदारांची संख्या 111 झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत नव्याने उतरलेल्या आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये जोरदार प्रचार केला होता, त्यामुळे केजरीवालांच्या एंट्री मुळे नेमकं कोणाचं नुकसान झालं हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

डेलीहंट करतंय दोन्ही निवडणुकीचे थेट कव्हरेज-

डेलीहंट दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह कव्हर करत आहे. निवडणुका केवळ आकड्यांवर नसतात, असे आमचे मत आहे.प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निकाला पर्यंत पोहोचण्यासाठी डेटा, नमुने आणि विश्लेषणाचा अर्थ लावण्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही सर्व कानाकोपऱ्यातून विश्लेषण करू आणि डेटा आणि त्याचा अर्थ काय आहे याचा सखोल अभ्यास आपल्यापुढे सादर करू. या निवडणूक निकालाचे विश्लेषण अशा प्रकारे सादर केले जाईल की ते सर्वाना अत्यंत सोप्या पद्धतीने समजेल. डेलीहंट वर तुम्हाला असे कव्हरेज मिळेल जे मतदानाचा अर्थ लावेल. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.

1) संपूर्ण भारतातील निकालांचे लाइव्ह अपडेट ते सुद्धा एका चांगल्या मांडणीच्या स्वरूपात.
2) सध्याच्या निवडणुकीतील आकडेवारी आणि त्याची मागील निकालांशी तुलना
3) राज्यवार आणि मतदारसंघनिहाय जागांच्या निकालाचे अपडेट
4) सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तसेच ट्विटरवरील ट्रेंडिंग स्टोरीज
5) याशिवाय थेट व्हिडिओ, व्हायरल मिम्स, ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडिओ अशा गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसंबंधित खास गोष्टींचे कव्हरेज मिळवण्यासाठी डेलिहंट चेक करा.