गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Gunaratne Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना चितावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आज त्यांच्यावर गिरगाव कोर्टात सुनावणी पार पडली असून त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर इतर महत्त्वाचे 2आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशीला 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी, सदावर्ते यांना दोन्ही वेळा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आता मात्र त्यांना न्यायालयीन कोठडी सूनावल्यामुळे ते जामीन अर्ज करू शकतात.यापूर्वी सरकारी वकील प्रशांत घरत यांनी सदावर्ते यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून 1.80 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोपही केला होता. आम्हाला अजून 2 दिवस सदावर्ते यांची पोलीस कोठडी हवी अशी विनंती सरकारी वकिलांनी केली होती मात्र कोर्टाने त्यांची विनंती फेटाळून लावली.

सदावर्ते यांना सातारा पोलीस उचलणार?? 

सातारा येथे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सातारा पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मागच्या सुनावणी वेळीही सातारा पोलीस मुंबईला गेले होते मात्र तेव्हा सदावर्ते यांना पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांना परत यावं लागलं होतं. परंतु आता सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सूनवल्या मुळे सातारा पोलीस त्यांचा ताबा घेण्यात यशस्वी होणार का हे पाहावे लागेल