हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सदावर्ते यांच्या सुरक्षेवर जो खर्च होतोय, त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. सदावर्ते यांच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख खर्च होतोय, ते काय सरकारचे जावई आहेत का असा सवाल मनसेने केला होता, याबाबत सदावर्ते याना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले, “राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंच कर्तुत्व काय? राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो, तर मी खूप बोलू शकतो. पण आज तो विषय नाही, आज ती वेळ नाही. त्यांनी टोल नाके बघावेत, आणि त्यावर किती पैसे मोजले ते बघावं . त्यांनी सरकारला शहाणपण शिकवू नये. माझ्यावर टीका करण्याऐवढे ते मोठे नाहीत. वन टू वन राज ठाकरे आणि सदावर्ते समोरा समोर येऊ द्या, मग मी काय ते सांगतो?. छोटे नेते, कार्यकर्ते बोलत असतील, तर मी रागवणार नाही”
यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करतायत. मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय? असा सवाल सदावर्ते यांनी केला. कोणी कितीही मोठा असला तरी? जरांगे पाटलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन केलं आहे असं सदावर्ते यांनी म्हंटल.