हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरु असून अनेक गावांमध्ये पूर आला आहे. येथील जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झाले असून सध्या पूरस्थिती गंभीर झाली आहे. गुजरातच्या खिजडीया मोटा या गावात पुराच्या पाण्यामध्ये जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पडधरी, राजकोट या परिसरात होणाऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुजरातमध्ये संततधार सुरु असल्याने गावांनी नद्यांचे रूप धारण केले आहे. लोकांच्या घरात पाणी घुसले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. द्वारका परिसरात जोराच्या पावसामुळे पूर नोंदवला गेला होता. गीर सोमनाथ, जुनागढ, अमरेली, देवभूमी द्वारका या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मागच्या वर्षी काही ठिकाणी पूर आला होता. याहीवर्षी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून गावेच्या गावे पाण्याखाली जात आहेत.
#WATCH Gujarat: Cattle washed away in flood at Khijadiya Mota village in Paddhari, Rajkot due to incessant rainfall. pic.twitter.com/QHAXW7tLIX
— ANI (@ANI) July 7, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.