हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोहित शर्माच्या अनुपस्थित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग नसल्यामुळे पांड्या दीर्घ काळानंतर क्रिकेटमध्ये परतला आहे.यावेळी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असा सवाल केल्यानंतर हार्दिकने दिलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या आहेत.
आगामी काळात कसोटी सामन्यात आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांचा भाग बनण्याची इच्छा नाही असं हार्दिकने स्पष्ट केलं आहे. माझ्यामुळे दुसऱ्या खेळाडूच्या हक्कावर गदा येईल असं कारण त्याने यावेळी सांगितलं. मला कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी 10% ही लय सापडलेली नाही असं त्याने म्हंटल. आटा मी एक टक्काही नाही. अशा परिस्थितीत मी कसोटी संघात आलो आणि अधिक पात्र असलेल्या व्यक्तीची जागा घेतली तर ते योग्य ठरणार नाही. मला कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर मला अधिक मेहनत करून स्वतःचे स्थान निर्माण करावे लागेल असं त्याने स्पष्ट केलं.
भारताकडून आतापर्यंत केवळ 11 कसोटी सामने खेळला आहे. त्याने 18 डावात एक शतक आणि चार अर्धशतकांसह एकूण 532 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 19 डावात 17 विकेट्सही घेतल्या आहेत. जुलै 2017 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होत तर ऑगस्ट 2018 मध्ये हार्दिकने शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.