मुबई : हॅलो महाराष्ट्र – जो खेळाडू आपल्या खेळीने सामन्याचे पूर्ण चित्र पालटू शकतो अशा खेळाडूला गेम चेंजर खेळाडू म्हंटले जाते. प्रत्येक टीम अशा खेळाडूच्या शोधात असते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो, असे भाकीत वर्तवले आहे. बॅटिंगसोबतच बॉलिंगमध्येही हार्दिक पांड्या कमाल करू शकतो. 7 महिन्यांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून (T20 World Cup) हार्दिकने टीम इंडियात पुनरागमन केले आहे.
काय म्हणाले सुनील गावसकर
‘हार्दिक पांड्या टी-20 क्रिकेटमध्ये (T20 World Cup) भारतासाठी गेम चेंजर ठरेल. फक्त वर्ल्ड कपच नाही तर भारत जेवढ्या मॅच खेळेल तिकडे त्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तो पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आणि बॉलिंगमध्येही भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरेल. मला हार्दिकला नव्या बॉलने बॉलिंग करतानाही बघायचे आहे’ असे सुनील गावसकर म्हणाले.
हार्दिक पांड्याला मागच्या काही काळापासून दुखापतीने ग्रासलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) फिट नसतानाही हार्दिकला खेळवण्यात आले. पहिल्याच राऊंडमध्ये टीम इंडिया बाहेर झाल्यानंतर खराब कामगिरीचं खापर पांड्यावर फोडण्यात आलं, तसंच त्याला टीमबाहेरसुद्धा काढण्यात आले. यानंतर हार्दिक पांड्या थेट आयपीएल खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याने या आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वात गुजरात टायटन्सना चॅम्पियन बनवले आहे. याच कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याचे टीम इंडियामध्ये कमबॅक झाले आहे.
हे पण वाचा :
7 वर्षांच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, आत्महत्या की हत्या? गूढ कायम
Cristiano Ronaldoची ‘त्या’ 13 वर्षे जुन्या खटल्यातुन निर्दोष मुक्तता
कल्याणमध्ये CCTV कॅमेरा फिरवून चोरट्यांचा दुकानावर डल्ला
सोम्या- गोम्याच्या ट्विटला मी उत्तर देत नाही : अजित पवार
देवेंद्र भुयारची लायकी माहिती असल्याने स्वाभिमानीतून हकालपट्टी केली : राजू शेट्टी