गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणविरोधी; भाजप आणि त्यांच्या संबंधांचा तपास करा – हसन मुश्रीफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणा विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनाला देखील विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचा धाडस या राज्यात कोण करू शकतो. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे का, याचा तपास केला पाहिजे, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्रीहसन मुश्रीफ यांनी केले.

ते शनिवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी सातत्याने मराठाविरोधी काम करत आहेत. त्यांचे आणि भाजपचे काही संबंध आहेत का, हे तपासण्याची गरज आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले.

नक्की काय आहे प्रकरण –

राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य शासनाचा हा आदेश संविधानाला खीळ बसवणारे असल्याचे  एॅड  गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment