आता ‘या’ मोठ्या खासगी बँकेने ग्राहकांना दिली भेट ! EMI झाला आहे खूप कमी; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँकांनंतर आता देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या कर्जाचे दर हे 0.10 टक्क्यांनी कमी केले आहेत . नवीन दर हे शुक्रवारपासून म्हणजेच 7 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. या निर्णयानंतर बँकेच्या सर्व ग्राहकांना त्याचा फायदा होईल. गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाचा ईएमआय 0.10 टक्क्यांनी खाली येईल. यापूर्वी 4 ऑगस्ट रोजी मंगळवारी युनियन बँक ऑफ इंडियानेही आपला व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला. पगारदार वर्गासाठी यूबीआयने गृह कर्जाचे दर 6.7 टक्के केले आहेत. युनियन बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पगारदार लोकांना 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी आता फक्त 6.7 टक्के व्याज द्यावे लागेल.

 

Image

युनियन बँक ऑफ इंडियानेही आपला व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला. पगारदार वर्गासाठी यूबीआयने गृह कर्जाचे दर 6.7 टक्के केले आहेत. युनियन बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पगारदार लोकांना 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी आता फक्त 6.7 टक्के व्याज द्यावे लागेल.

गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी-चलनविषयक धोरण समिती) व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला. त्यात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर हा 4% वर कायम आहे. एमपीसीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के राहील. एमएसएफ, बँक दर 4.25% वर कायम आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment