हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC Bank ने आजपासून आपल्या होम लोन वरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने बुधवारी सांगितले की सर्व मुदतीच्या होम लोनसाठी MCLR 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांनी वाढवला आहे.
HDFC Bank च्या म्हणण्यानुसार, नवे दर 7 सप्टेंबरपासून लागू होतील आणि एका वर्षापासून ते सर्व मुदतीच्या कर्जावर त्याचा परिणाम होईल. मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मधील ही वाढ नवीन आणि विद्यमान दोन्ही कर्जांवर लागू होईल. यासह, बँकेच्या MCLR शी संलग्न होम लोन, ऑटो लोनसह इतर सर्व प्रकारच्या कर्जांच्या EMI मध्ये देखील वाढ होईल.
MCLR कितीने वाढला ???
HDFC Bank च्या वेबसाइटवरील माहिती नुसार, या ताज्या दरवाढीनंतर आता एक वर्षाचा MCLR 8.2 टक्के तर ओव्हरनाईट MCLR 7.9 टक्क्यांवर आला आहे. इथे हे लक्षात घ्या कि, एक वर्षाचा MCLR जास्त महत्त्वाचा आहे कारण होम लोन सहित बहुतांश दीर्घकालीन कर्जे या दराशीच जोडलेली आहेत. म्हणजेच होम लोनचा व्याजदर आता 8.20 टक्के इतका केला जाणार आहे.
आता बँकेकडून एक महिन्याचा MCLR 7.90 टक्के, तीन महिन्यांचा 7.95 टक्के आणि सहा महिन्यांचा 8.05 टक्के करण्यात आला आहे. HDFC Bank ने गेल्या महिन्यात फंड बेस लेंडिंगच्या मार्जिनल कॉस्टमध्ये 5 ते 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.
एप्रिल 2016 पासून सुरू झाली ‘ही’ व्यवस्था
एप्रिल 2016 पासून बँकांनी MCLR ची गणना सुरू केली, जेणेकरून विविध मुदतीच्या कर्जासाठी व्याजदरांची गणना करण्यासाठी हे सूत्र वापरले जाऊ शकेल. सर्व बँकांकडून दर महिन्याला आपल्या MCLR चे पुनरावलोकन केले जाते, जेणेकरून कर्जाची योग्य किंमत मोजता येईल. MCLR निश्चित करताना, कर्जाची किंमत आणि इतर खर्च देखील जोडले जातात जेणेकरून व्याजाचा अचूक दर निश्चित केला जाईल.
RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सर्वचा बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये, आता HDFC देखील सामील झाला आहे. RBI ने मे महिन्यापासून रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर अनेक बँकांची कर्जे महागली आहेत. HDFC Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/borrow/popular-loans/home-loan/rate-of-interest
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock मध्ये फक्त 15 हजार रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदार बनले करोडपती !!!
Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा नवे दर
LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लॅन, त्याविषयी जाणून घ्या
RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा
HDFC Bank ने ग्राहकांसाठी सुरू केली SMS बँकिंगची सुविधा, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पहा