हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा सर्व प्रसिद्ध शो म्हणजे कौन बनेगा करोडपती होय. गेल्या कित्येक वर्षात या शोची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या शोची आणखी एक खासियत म्हणजे तळागाळातून आलेला एखादा माणूस आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडो रुपये जिंकलेल्या अनेकांची बरीच उदाहरणे या शोमधून पुढे आली आहेत. अशाच एका विजेत्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. १९ वर्षांपूर्वी एका मुलाने कौन बनेगा करोडपती ज्युनिअर शो वयाच्या १४ व्या वर्षी जिंकला होता. आज तो मुलगा एस पी आहे आणि सेवा बजावत आहे.
१९ वर्षांपूर्वी त्याने १ कोटी रुपये जिंकले होते. २००१ मध्ये वयाच्या १४ वर्षी रवी मोहन या मुलाने आपल्या बुद्धीच्या जोरावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन कौन बनेगा करोडपती ज्युनिअर चा शो जिंकला होता. यानंतर यूपीएससी ची परीक्षा देऊन हा मुलगा आयपीएस अधिकारी झाला आहे. आता हा मुलगा रविमोहन सैनी पोरबंदर येथे एस पी म्हणून कार्यरत आहे. २०१४ मध्ये तो आयपीएस अधिकारी झाला. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्याने हा शो जिंकला होता. तेव्हा तो १४ वर्षाचा होता. आता तो ३३ वर्षाचा आहे.
Gujarat: Rajkot Police orders inquiry over a TikTok video wherein a boy is seen sitting on a Police PCR van. Ravimohan Saini, DCP Rajkot, says, “It is confirmed that the vehicle was from B Division of Rajkot Police & we will take action once investigation is done.” pic.twitter.com/vFGESD6UWN
— ANI (@ANI) July 26, 2019
रवी यांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतले आहे. २०१४ तो गुजरातचा आयपीएस झाला. पोरबंदर येथे एसपी होण्याआधी तो राजकोट येथे डीसीपी होता. रविचे वडील नौसेनेत होते. बुद्धिमतेच्या जोरावर या शोमध्ये अनेकांनी पैसे जिंकले आहेत. अनेक सकारात्मक उदाहरणे या शोमधून समोर आली आहेत. रवी मोहन सैनीही त्यापैकीच एक होय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.