हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढत असून चिंतेच भर पडत आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध लादून देखील कोरोना काही आटोक्यात येत नसून आता खरच महाराष्ट्रात लॉकडाउन होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन संदर्भात मोठं विधान केले आहे.
राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणं म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज वाढत आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात बैठ दुपारी 12.30 वाजल्यापासून ते 1.30 पर्यंत बैठक झाली झाली. दररोज 10 टक्के प्रति दिवस रूग्णसंख्येत वाढ होतेय. दोन -तीन दिवस आणखी आढावा घेतला जाणार आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group