हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर आता तरी लॉकडाऊन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परंतु प्रत्यक्षात लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज तसे संकेत दिले. मात्र, लॉकडाऊन किती दिवसांनी वाढवायचा यावर अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेलं पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं
कोरोना ऊपचाराचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही तर काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे यासंबधीच्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन केले जावे असा आमचा प्रयत्न आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंनी सांगितले. आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.