बंगळूर : वृत्तसंस्था – बंगळूर येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करत असताना एका व्यक्तीला अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. हि संपूर्ण घटना त्या मॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाली आहे. यामध्ये एक व्यक्ती हृदय विकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचा जीव वाचवताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) डॉक्टरच्या मुलाने ट्वीटरवर पोस्ट केला आहे.
काय घडले नेमके?
बंगळूर येथील आयकिया स्टोअर येथे एक व्यक्ती खरेदीसाठी गेला होता. या ठिकाणी खरेदी सुरु असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो अचानक जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर एक व्यक्ती पळत येऊन त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. ती व्यक्ती पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्याने पीडित व्यक्तीच्या छातीवर दाब टाकत त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे.
My dad saved a life. We happen to be at IKEA Bangalore where someone had an attack and had no pulse. Dad worked on him for more than 10 mins and revived him. Lucky guy that a trained orthopedic surgeon was shopping in the next lane. Doctors are a blessing. Respect !!! pic.twitter.com/QXpXTMBOya
— Rohit Dak (@rohitdak) December 29, 2022
या डॉक्टरच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तीचा जीव वाचला आहे. तर या डॉक्टरच्या मुलाने हा व्हिडिओ (Viral Video) आपल्या ट्वीटरवर शेअर केला असून त्यांच्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याचे त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 10 मिनीटापेक्षा जास्त वेळ या व्यक्तीवर उपचार केल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..