पुणे प्रतिनिधी | पुण्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात रस्त्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Ganpati) गणपतीसमोरील रस्त्यावरही पाण्याचा मोठा विसर्ग चालू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे.
#WATCH: Heavy rainfall triggers waterlogging in parts of Pune; visuals from near Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple. #Maharashtra pic.twitter.com/1NyGodKDaB
— ANI (@ANI) October 14, 2020
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वांनी सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
पुणेकरांची झोप उडाली! शहरात सर्वत्र पाणीचपाणी; सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/gyjuXCvmKW#pune #punerains #पुण्याचा_पाऊस #rain #Maharashtra #HelloMaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 14, 2020
पुणे शहरात दुपारी २.३० पासून पाऊस सुरू आहे. रात्री ११ वाजेपर्यंत हवामान विभागाने केलेल्या नोंदीनुसार कात्रज भागात १४२ मि.मी, खडकवासला भागात १०८ मि.मी., वारजे येथे ६३ मि.मी व कोथरूड येथे ६७ मि.मी पावसाची नोंद केंद्रात करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांसाठी हा अॅलर्ट आहे. रात्री उशिराच्या नोंदीनुसार कात्रज भागात १०० मिमी इतका पाऊस पडला आहे.
पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/dcji907gC9#Pune #punerains #Rainfall #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 14, 2020