राज्यातील प्राध्यापक भरतीबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा ; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना व लॉकडाऊनमुळे शिक्षण विभागाच्या अनेक पदांच्या भरती रखडलेल्या आहेत. त्याबाबत आता राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्यावतीने महत्वपूर्ण चर्चा केली जात आहे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली. राज्यात प्राध्यापक आणि प्राचर्य भरतीला मंजुरी मिळाली असून 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करु तसेच राज्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती 7 महिन्यात पूर्ण केली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिसभा सदस्य यांच्या आयोजित बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महत्वपूर्ण घोषणा केली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/265387985415398

यावेळी मंत्री उदय सामंत यांनी “राज्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती 7 महिन्यात पूर्ण केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून हे प्राध्यापक रुजू होतील. विद्यापीठ महाविद्यालयांना पत्र पाठवून अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सूचना करणार आहे,” असे आश्वासनही दिले.

राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेच्या मागणीसाठी राज्यात पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांत प्राध्यपकांच्यावतीने आंदोलने करण्यात आली. प्राध्यापकांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने प्राध्यापक भरतीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

Leave a Comment