हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने देखील सत्तेत आल्यानंतर मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं, मोदींनी सुद्धा स्वतःच नाव दिलं हे पाहून मला त्याचीच आठवण आली, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन झाले.तसेच देशातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे अशी घोषणा अमित शहा यांनी केली होती. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्या कसोटी सामन्याआधी मैदानाचं नाव बदलण्यात आलं. हे मैदान मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि संपूर्ण परिसराचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असं करण्यात आलं होतं. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलत नरेंद्र मोदी स्टेडियम असं देण्यात आलं. यावरुन आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.