इस्लामपूरात भाजप युवामोर्चाकडून विद्यापीठ विधेयकाची होळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने विद्यापीठ विधेयक पारित केल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर येथे तहसीलदार कार्यालयासमोर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. नव्या विद्यापीठ विधेयकाची होळी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक उपस्थित होते. राहूल महाडिक म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख तयार केली.

महविकास आघाडी सरकारची वक्रदृष्टी आता विद्यापीठ विषयात वळली आहे. राज्यातील भ्रष्टाचाराचे इतर विषय कमी पडले म्हणून की काय, आता थेट विद्यापीठात भ्रष्टाचार करावा. विद्यापीठांच्या जमिनी घशात घालाव्या असा मानस ठेवून थेट कुलपतींच्या अधिकारांवरच घाला घालण्याचे पाप या सरकारने केले आहे. वर्षानुवर्ष असणारी रचना मोडून कुलपतींचे अधिकार कमी करून आता शिक्षण मंत्र्यांना प्र-कुलपती म्हणून अधिकार देण्याचा घाट यांनी घातला आहे.

आता विद्यापीठातही यांचे सचिन वाझे घुसवण्यासाठी ही तयारी असल्याचे दिसते. भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विषयात असला अन्याय सहन करणार नाही आणि म्हणून ही लढाई विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा इशारा यावेळी भाजप युवा मोर्चाच्यावतीने देण्यात आला.

Leave a Comment