हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर सध्या फेक मेसेज आणि फेक न्युज यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण आणि चुकीचे संदेश जाण्याचा मोठा धोका असतो. असाच एक फेक मेसेज सध्या व्हाट्सअप वर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे.
‘सोशल मीडियावर फिरणारा हा मॅसेज दिशाभूल करणारा आहे. सोशल मीडिया हा आपला अधिकार आहे त्यावर पोलिस यंत्रणा लक्षात ठेवत नाहीत. पण सामाजिक वातावरण दूषित करणारा अथवा समाजात तेढ निर्माण करणारा चुकीचा संदेश फॉरवर्ड करणार्यांवर कारवाई केली जाईल’. असे ट्वीट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केले. ‘उद्यापासून व्हाट्सअप आणि फोन कॉल चे नवीन नियम लागू करण्यात येतील’ अशा शिर्षकाखाली एक बातमी व्हाट्सअपवर फिरत होती.
https://twitter.com/OfficeofAnilD/status/1349225178543190016
त्या बातमीमध्ये,
– सर्व कॉल रेकॉर्डिंग केले जातील,
– व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर आणि सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल.
– ज्यांना माहीत नाही अशा सर्वांना कळवा
– आपले डिव्हाइस मंत्रालय सिस्टीम कनेक्टेड होतील
– कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नये याची खबरदारी घेण्यात यावी
– आपल्या मुलाला, भाऊ, नातेवाईक, मित्र आणि ओळखीचे सर्वांना माहिती द्या.
– राजकारण्यांवर सद्यस्थितीत सरकारवर आणि पंतप्रधानांवर कोणतीही पोस्ट आणि व्हिडिओ पाठवू नका. अशा आणि अनेक सूचना या मेसेजमध्ये देण्यात आल्या होत्या आणि त्यावर पुढे पाठवण्याची अपील सुद्धा केली होती. त्यानंतर हा मेसेज बर्याच व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवल्याचे निदर्शनास आले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.