हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात ऑटो मोबाईल क्षेत्रात नामवंत असलेल्या (Honda Activa) कंपनीने आपले नवीन इलेक्ट्रिक मॉडेल तयार केलेले आहे. कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर 23 जानेवारी रोजी लॉन्च करणार आहे. कंपनीने हे Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणले आहे. जाणून घेऊया याची किंमत आणि खास फीचर्स काय आहेत ते….
होंडा कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या या नवीन मॉडेलला 23 जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. यासाठी ब्रँडने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक टीझर सुद्धा जारी केला आहे. नुकतेच इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंट मध्ये अनेक नवीन ब्रँडने एन्ट्री केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल व सीएनजीच्या वाढत्या दरामुळे इलेक्ट्रिक टू व्हीलर्सची मागणी चांगलीच वाढू लागली आहे. यामुळे Activa इलेक्ट्रीक स्कूटला बाजारात लाँच करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (Honda Activa)
Swappable Battery सोबत येईल स्कूटर (Honda Activa)
होंडा ऍक्टिव्हाने तयार केलेली नव्या ढंगाची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर स्वॅपेबल बॅटरीसोबत येणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने बेंगळुरू मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत पार्टनरशीपमध्ये आपल्या बॅटरी स्पॅपिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. होंडा आपली इलेक्ट्रिक स्कूटर स्वॅपेबल बॅटरी सोबत लाँच करू शकते. हे स्वॅपेबल पहिले इलेक्ट्रिक टू व्हीलर ठरू शकते. भारतात बॅटरी स्वॅप सेवा ब्रँडची सहाय्यक कंपनी Honda Power Pack Energy India Pvt द्वारा कंट्रोल केली जाणार आहे.
होंडा ऍक्टिव्हा इलेक्ट्रिक व्हेरियंट Honda Activa Hybrid
होंडा ऍक्टिव्हा कंपनी 23 जानेवारी रोजी Honda Activa Hybrid चे इलेक्ट्रिक व्हेरियंटला आणणार आहे. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या टीझर मध्ये ‘H-Smart’ चा लोगो पाहायला मिळत आहे. त्यानुसार कंपनीचे Activa Hybrid इलेक्ट्रिक बाजारात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Honda Activa)
प्रामुख्याने ‘ही’ आहेत खास फीचर्स (Honda Activa)
आतापर्यंत असलेल्या फिचर्समध्ये आणि होंडाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स मध्ये खूप फरक असणार आहे. इंडिकेटर माउंटेड फ्रंट एप्रन, फ्लॅट सीट, सिल्वर कलर, रिमूव्हबल बॅटरी सारखे खास फीचर्स या नव्या मॉडेलमध्ये दिले जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये या स्कूटरला वेगवेगळ्या डिझाइन आणि किंमतीत आणले जावू शकते. या स्कूटरची टक्कर TVS iQube Electric, Simple Energy One, Ather 450X आणि Bounce Infinity E1 शी होणार आहे.
इलेक्ट्रिक अॅक्टिव्हाची खास वैशिष्ट्ये?
अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक मॉडेलच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये इंडिकेटर माउंटेड फ्रंट ऍप्रॉन, फ्लॅट सीट, सिल्व्हर कलर रेल, सीटखाली काढता येण्याजोग्या बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात.आंतरराष्ट्रीय बाजारात हे मॉडेल अनेक प्रकारच्या डिझाईन्स आणि किमतींसह ऑफर केली जाऊ शकते. हे TVS iQube इलेक्ट्रिक, Simple Energy One, Ather 450X आणि Bounce Infinity E1 शी स्पर्धा करू शकते. (Honda Activa)
Stay Tuned for a new smart.#Staytuned pic.twitter.com/N6E5Mz2Rln
— Honda 2 Wheelers India (@honda2wheelerin) January 9, 2023
हे पण वाचा :
Ola S1 Pro vs Honda Activa 6G : कोणती गाडी खरेदी करणे फायद्याचे? किंमत अन् फिचर्स तपासा
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही..
लवकरच इलेक्ट्रिक बाईक स्वरूपात येणार Activa
iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज
Cheapest Electric Scooters : या आहेत सर्वात स्वस्त Electric Scooters; स्पीड आणि मायलेजही जबरदस्त