सांगली प्रतिनिधी । पलूस येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ यांच्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास गोळीबार झाला होता.मात्र या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. हल्लेखोर आरोपी सूरज सुधाकर चव्हाण याला डफळापुर येथे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिली.
पलूस येथील प्रसिद्ध व्यापारी प्रदीप वेताळ यांच्यावर भर दिवसा गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये वेताळ थोडक्यात बचावलेले होते. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी लगेच पोलिसी सूत्रे हालावण्यास सुरुवात केली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली होती. या सगळ्या प्रयत्नांनी सांगली येथील एलसीबीच्या जाळ्यात आरोपी डफळापुर येथे सापडला. दरम्यान, प्राथमिक चौकशी वरून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वेताळ यांच्याकडे नोकरी करत होता. त्याला वेळेवर पगार दिला नाही म्हणून या रागपोटी त्याने असे कृत्य केले असावे असे समोर येत आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा २४ तासात लावल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.