लढा कोरोनाशी | कोरोना विषाणूचे हे संकट अमेरिकेच्या पत्रकारांना बहुगुणी पत्रकार बनण्यासाठी मदत करत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रशासनाच्या इतर अधिकाऱ्यांकडून येणारे मिश्र संदेश आणि ट्रम्पकडून उजव्या पक्षातल्या माध्यमांमध्ये वाढलेले खुशमस्करे हे सगळे चित्र वाचक आणि दर्शकांसमोर ठेवत असताना ते गोंधळलेले आहेत. न्यूजरूम बंद करण्यासहीत सार्वजिनक आरोग्याच्या निर्बंधामुळे पत्रकारांच्या बातम्या देण्याच्या कृतींवर मर्यादा लागू झाल्या आहेत. बिघडणाऱ्या आर्थिक चित्रासह काही नवीन वृत्त संस्थांच्या आर्थिक व्यवहारावर शंका निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देणारी अमेरिकी माध्यमं एकटी नाहीत. कोरोना विषाणूप्रमाणेच हे देखील जागतिक आव्हान आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याचे वेगळे महत्व आहे.
आज सकाळी मी इटली, फ्रान्स, युके आणि दक्षिण कोरिया या चार देशातील माध्यमांच्या प्रतिसादाबद्दल पाहिले.
युनायटेड किंगडम (UK) – मागच्या आठवड्यात युके सरकार इतर देशांच्या तुलनेत या विषाणूकडे वेगळ्या दृष्टकोनातून पाहत आहे अशा आशयाचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाले. सांगण्यात आले की, लोकसंख्येच्या तुलनेत एखादा घटक सहज परिणाम करून सामूहिकरित्या प्रतिकारशक्ती वाढवू शकेल. यामुळे या संकटाला दडपण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु संपूर्णपणे नाही. अटलांटिकमधील विज्ञान लेखक एडमंड याँग (कोरोना विषाणूच्या माहितीला मासिकामध्ये स्थान देण्यासाठी आपले पुस्तक स्थगित केले.) यांनी काल लिहिले. ब्रिटिश सरकारच्या तज्ज्ञांनी पत्रकारांशी बोलताना नक्कीच आवाज उठवला. ते म्हणाले, सरकार जाणीवपूर्वक ६०% लोकांना आजारी पडू देत होते. शांत राहा आणि हे सुरु ठेवा आणि कोविड- १९ मिळवा. तरीही अशी परिस्थिती नव्हती. या विषाणूविषयीचा “या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या वेळी कसा संवाद साधू नये” हा जागतिक दृष्टिकोन युके देत नव्हते. हे एका अभ्यासात दिसून आल्याचे एका तज्ज्ञांनी याँग ना सांगितले. रविवारच्या टेलिग्राफमध्ये ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी स्पष्ट केले आहे.
एक पुराणमतवादी वृत्तपत्र जे हॅनकॉकला मालक मानते. त्यामधील एका कर्मचाऱ्याला बोरिस जॉन्सननी सांगितले कि, सामूहिक प्रतिकारशक्ती ऐवजी त्याच्याशी संबंधित संभाव्य वैज्ञानिक परिणाम असणार आहे. ती काही ब्रिटनची योजना नाही. सुरुवातीला हॅनकॉकचा लेख मर्यादित लोकच बघू शकत होते, नंतर पत्रकारांच्या व्यापक तक्रारीनंतर जॉन्सनच्या सरकारने पत्रकारांसह त्यांना आवडत असणाऱ्या प्रकाशकांना जीवनावश्यक सार्वजनिक आरोग्यविषक माहीती दिली. ( दुसऱ्या शब्दांत आय टीव्हीचे प्रख्यात पत्रकार रॉबर्ट पेस्टन यांनी आठवड्याच्या शेवटी बातमी दिली, ब्रिटन काही महिन्यापासून युद्ध पातळीवर अलगावसंदर्भातील अधिकृत शब्द ऐकण्यापूर्वीच वृद्ध रहिवाशांना त्यासाठी एकत्रित करीत होते.) जॉन्सनच्या सरकारने पक्षपातीपणाचे आरोप नाकारले तरीही, काल त्यात बदल झाला आणि जॉन्सन सरकारने (एक ज्येष्ठ प्रतिनिधी ) दररोज समोर येणाऱ्या संकटाबद्दल संक्षिप्त माहीती उपलब्ध करून दिली. प्रत्येकजण याबाबतीत आनंदी आहे असे नाही. द गार्डियनचे स्तंभलेखक सिमोन जेन्किस यांनी काल लिहिले, जॉन्सनचा सत्य बोलण्याचा इतिहास पाहिल्यास, जर दुर्घटना घडणारच असेल तर ती हीच आहे.
इटली – आयसीवायएमआय : पॅनिक टाइम
इतर देशांमध्ये आपण पाहिलेल्या आणि त्यांच्याकडून राबविण्यात आलेल्या गंभीर अंमलबजावणीला ब्रिटिशांनी थांबविण्यास सांगितले. काल पॅनिक टाइम्सच्या पहिल्या दैनिकात जॉन्सनने सांगितले कि, ब्रिटिशांनी अनावश्यक संपर्क टाळला पाहिजे. परंतु युरोपमध्ये इटलीने गेल्या आठवड्यात जेव्हा संचारबंदी लागू केली तेव्हा ब्रिटनप्रमाणेच त्यांच्या दळणवळणाच्या धोरणाला प्रश्न विचारण्यात आले. मागच्या आठवड्यात इटलीमधील Il Foglio या वृत्तपत्रात मॅटिया फेरेरासी, यांनी परराष्ट्र धोरणासंदर्भात लिहिले, राजकारणी प्रत्येक माहितीचे राजकीय फायद्यासाठी शस्त्र म्हणून वापर करतात. सध्याच्या राजकीय अस्थिरतेनेच असे वातावरण निर्माण केले आहे. आणि कोरोना विषाणूचे संकट या प्रवृत्तीसाठी प्रतिकार ठरणार नाही. कोणतीही अनधिकृत माहीती अगदी संचारबंदीच्या आदेशाच्या मसुद्यासहित माध्यमांमध्ये गोंधळ उडवून सार्वजनिक भीती निर्माण करते. (इटलीचे पंतप्रधान जिसेपी कॉन्ट अनावधानाने विविध संदेश पाठविण्याच्या महत्वाविषयी बोलले जेव्हा कि, त्याना निसंदिग्ध असे म्हणायचे होते.) फक्त राजकारणीच समस्या नसतात तर माध्यमाच्या आहारी गेलेले आणि कधी कधी प्रसिद्धीसाठी भुकेले वैद्यकीय तज्ज्ञसुद्धा विषाणूबद्दल वाद घालून लोकांमधला विश्वास कमी करतात.
नुकतेच त्यांनी लिहिले होते, इटलीचे लोक त्यांच्या फुटबॉल संघापेक्षासुद्धा अधिक त्यांच्या प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञांसाठी विभागले जातात. अगदी वृत्तवाहिनींवरील बातम्यांना बंदी आहेच पण इटलीतील पत्रकारांनी देखील दूर जाणे सोडले आहे. निक स्क्वायर्स या रोमच्या टेलिग्राफच्या प्रतिनिधींनी एका जाहीरपत्रातून नुकतेच माध्यमांना सांगितले, असे दिसते की, केवळ पत्रकार आणि डॉक्टर आधीपेक्षा जास्त काम करत आहेत. मागच्या आठवड्यात अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला, की माध्यमसेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. म्हणूनच संचारबंदीच्या काळात माध्यमे खुली राहू शकतील. तरीही अनावश्यक हालचालींवर असलेल्या निर्बंधामुळे बातमीचे काम करताना एरवीपेक्षा जास्त त्रास होतो आहे. मिलान मधील मुक्तपत्रकार आलेसिओ पेरॉन यांनी मागच्या आठवड्यात सांगितले, जसे एल इको द बर्गामो त्याची पाने केवळ प्रेमाने भरत असतो त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढणारी वृत्तपत्रे म्हणजे काही आता मोकळी आहेत म्हणून पर्याय ठरू शकत नाहीत. .
फ्रान्स – गेल्या आठवड्याच्या शेवटी इटलीमध्ये राहणाऱ्या ३० फ़्रेंच पत्रकारांनी आपल्या घरी एक खुले पत्र लिहून चेतावणी दिली की अद्यापही फ्रेंच जनतेला परिस्थितीची तीव्रता समजली नाही. तेव्हापासून फ्रेंच सरकारने शाळा आणि काही व्यवसाय बंद करण्यास सुरुवात केली. काल रात्री राष्ट्राध्यक्ष इम्यानुअल मॅक्रॉन यांनी संचारबंदी जाहीर केली. पुढे जाऊन तेथील पत्रकारांसहित नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल जसे इटलीमध्ये ठेवले गेले. फ्रेंच माध्यमांनी आधीच या विषाणूला आळा घालण्यासाठी प्रसार सुरु केला आहे. टीव्हीवरील कार्यक्रम रद्द केले गेले आहेत नाहीतर प्रेक्षकांशिवाय चित्रित केले जात आहेत. सामाजिक अलगावच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करण्यासाठी पॅनलमध्ये कमी पाहुणे असतात. अनावश्यक कर्मचारी घरातून काम करत आहेत. लेपल माईक टाळण्यासाठी आवाजाच्या तंत्रज्ञानामध्ये बदल केले गेले आहेत. अमेरिकेप्रमाणेच Le Monde सहित प्रमुख माध्यमे ही कोरोना विषाणूच्या बातम्यांसाठी मोफत देऊ केली आहेत. जी मुले शाळेत जाऊ शकत नाहीत अशा मुलांना इतर माध्यमे शैक्षणिक संसाधने म्हणून दिली आहेत. राष्ट्रीय आणि प्रादेशिक फरक बाजूला ठेवून विविध लोकशाहीतील वृत्तसंस्था विषाणुच्यासंदर्भात जी माहीती देत आहेत त्यामध्ये सप्ष्टपणे समानता आहे. मनुष्य म्हणून आपण त्यांच्या समवेत उभे आहोत. पत्रकार म्हणून अचूक माहीती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शक्य तितक्या वेळा ते सरकारवर अवलंबून आहेत.
दक्षिण कोरिया – दुसऱ्या बाजूला दक्षिण कोरियासारखा देश गेल्या काही आठवड्यातील त्यांच्या पारदर्शक दृष्टिकोनासाठी कौतुकास पात्र ठरला आहे. त्यांच्या प्रतिसादाची कार्यक्षमता आणि परिपूर्णता यांनी गौरवोद्गार मिळविले आहेत. या साथीच्या रोगाशी लढत असताना केवळ तंत्रज्ञान नाही तर माहितीविषयक स्वच्छता या सद्गुणांचाही समावेश आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या ईशान थरूर यांनी दक्षिण कोरियाबद्दल सकाळी लिहिले आहे कि, “पश्चिमेकडील लोकशाही राष्ट्रामध्ये अशा प्रकारची जागरूकता आणि सार्वजनिक विश्वास खूप कमी आहे.
कोरोना विषाणूबद्दल अधिक खालीलप्रमाणे : लोकशाही नसलेल्या ठिकाणचे दृश्य Javier C. Hernández यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिले आहे, चीनी पत्रकार त्यांच्या कामाच्या सेन्सॉरशिपविरोधात लढा देत आहेत. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला क्वचितच असे आव्हान देण्यात आले आहे. आणि सार्वजनिक पाठींबा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांना मोकळेपनाने बोलण्यासाठी कॉल केले गेले आहेत. सेन्सॉरचा त्रास टाळण्यासाठी त्याच्या प्रतिस्पर्ध्यासह माहीती लोकांना पोहोचविण्याच्या उपायांचा त्यांनी वापर केला आहे. यासाठी त्यांना चीनी इंटरनेट वापरकर्त्यांच्या संरक्षण प्रयत्नांनी देखील सहकार्य केले आहे.
ताजे :– काल अमेरिकेत आणखी एक वाईट बातमी घडली. शेअर मार्केट ५०० ची बाजारात घसरण झाली, १९८७ नंतर पहिल्यांदाच इतक्या वाईट दिवसाची नोंद झाली. १९१८ साली उद्रेक झालेल्या स्पॅनिश फ्लू नंतर पहिल्यांदाच उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख पुढे ढकलली. न्यू जर्सीमध्ये संचारबंदी लागू झाली असून राज्यातील रहिवाशांवर निर्बंध लादले जात आहेत. ट्रम्पनी देशभरातील लोकांना १० पेक्षा जास्त लोकांचा संपर्क टाळण्याचा सल्ला दिला आहे. या दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या ऍरिझोना, फ्लोरिडा आणि इलिओनमधील प्रमुख गोष्टी नियोजित वेळेपेक्षा पुढे जाण्यास तयार झाल्याचे दिसते. आज ओहिओमध्ये नियोजित स्पर्धा राज्यपाल माईक डिव्हाईन यांनी शेवटच्या क्षणी पुढे ढकलली. एका परीक्षकाने डिव्हाइनची ही स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती नाकारली पण डिव्हाईननी आपल्या अधिकारांचा वापर करीत त्यांचे बोलणे नाकारले.
बदलता सूर – गेल्या आठवड्यात मी लिहिले होते, फॉक्स न्यूजचे काही लोक कोरोना विषाणूच्या या धमकीला दुर्लक्षित करीत होते, पण आता ट्रम्पचा सूर बदलल्यामुळे त्यांचाही सूर बदलतो आहे. तेव्हापासून वॉशिंग्टन पोस्टच्या पॉल फराही आणि सारा एलिसन यांनी दिलेल्या वृत्तानुसार नेटवर्कवरचा सूर अधिक जलद पवित्र्याकडे (बहुतेक ठिकाणी) वळला आहे. टकर कार्लसन ज्याला या संकटाची कल्पना इतरांपेक्षा आधी आली होती, (चांगल्या कारणास्तव नसली तरी) त्याने ट्रम्पना या विषाणूकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले.
डीसी अंतर – कालपासून व्हाईट हाऊसमधील संवाददाता समिती सदस्यांना शक्य तितक्या दुरून काम करण्यास सांगत आहे. शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना लांबून काम करण्यास सांगून ब्रिफींग रूमची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणजे सामाजिक अलगाव पाळता येईल. त्यामध्ये सेंटर ऑफ कोऑपरेटिव्ह मीडियाचे संचालक Stefanie Murray, Nieman Lab साठी लिहितात, अमेरिकेतील ओरेगॉनमधील किमान १६ वृत्तसंस्था, माध्यमे कोरोना विषाणूच्या माहितीच्या प्रसारणाला चालना देण्यासाठी एकत्र काम करीत आहेत. उदाहरणार्थ Malheur Enterprise चे संपादक Les Zaitz आणि saleam पत्रकार यांच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचे लेख प्रसारित करीत आहेत. (एका मजेच्या विचलनासाठी म्हणून अलेक्झांड्रिया निझनने झैत ची त्याच्या नेटफ्लिक्स वरच्या वाईल्ड वाईल्ड कंट्री या सिरीजमधल्या भूमिकेबद्दल मुलाखत घेतली होती.)
डिजिटल विभाजन – टोनी रोमने पोस्टसाठी केलेल्या बातमीत लिहिले आहे, शाळा बंद असल्यामुळे सतत भासणाऱ्या काही समस्या वाढत आहेत. काही मुलांना इतर मुलांपेक्षा जास्त इंटरनेट वापरायला मिळते. रोम लिहितो, अमेरिकी सरकारने आणि टेलिकॉम इंडस्ट्रीनेहे डिजिटल विभाजन संपवण्यासाठी आणखी काही करायला हवे होते का? असा प्रश्न या विषाणूच्या साथीच्या काळात विचारला जाईल. थोडक्यात जरी तुम्ही घरी असाल तरी तिथल्या रहिवाशांपर्यंत लंडनमधील सर्वोत्कृष्ट गोष्टी पोहोचविण्यासाठी लंडनचे टाइम आउट हे आपल्या आवृत्तीचे नाव बदलून टाइम इन असे ठेवणार आहेत. बहुतेक कर्मचारी घरी बसून काम करीत असताना बझफीड मधील सुविधा कर्मचारी तेथील वृक्षांची काळजी घेत आहेत. आणि जर्मनीतील बिग ब्रदरच्या स्पर्धकांना हा साथीचा रोग देशभर पसरत आहे याची कल्पनाच नाही पण आज रात्री त्यांना थेट प्रक्षेपणातून कळणार आहे.
मूळ लेखक – जॉन अलसोप, कोलंबिया जर्नालिझम रिव्ह्यू. | अनुवाद – जयश्री देसाई
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण
खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी
कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित
निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली
‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा