हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात जवळपास नऊ महिन्यांपासून कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होतो आहे आणि या विषाणूबद्दल सतत संशोधन चालू आहे. कोविड १९ चा हा विषाणू बोलण्यातून आणि गाण्यातून किती किंवा कसा पसरतो हे आता शोधले जात आहे. नुकत्याच झालेल्या दोन अभ्यासांमध्ये (Study on Corona) असे दिसून आले आहे की, बोलताना आणि गाताना तोंडामधून सूक्ष्म कण (Aerosol) बाहेर पडण्याचे प्रकार काय आहे आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या बोलण्याने किंवा गाण्याने तो संसर्ग कसा पसरतो.
स्वीडनमधील संशोधकांनी 19 पॉझिटिव्ह आणि 12 निगेटिव्ह म्हणजे स्वस्थ व्यक्तींवर कोविडची चाचणी केली, त्यातील निम्मे प्रोफेशनल ओपेरा गायक होते. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोकं बोलतात किंवा गातात तेव्हा वातावरणात हे सूक्ष्म कण कसे पसरतात हे पाहण्यासाठी या सर्व लोकांना एकेक करून एका कक्षात बोलावून बोलण्यास आणि गाणे गाण्यास सांगण्यात आले.
या अभ्यासाने अतिशय मनोरंजक आणि काही उपयुक्त अशा बाबी उघड केल्या आहेत. आपण अंदाज लावू शकता की, कोणत्या प्रकारचे शब्द किंवा अक्षरांद्वारे आपल्या तोंडामधून अधिक सूक्ष्म कण बाहेर पडतात आणि कोणती अक्षरे बोलण्याने कमी बाहेर पडतात?
या अभ्यासाचा परिणाम काय झाला?
ज्या गायकांवर प्रयोग केला गेला त्यांना एक बाल कविता एकाच पीचवर अनेकवेळा गाण्यास सांगितले गेले आणि त्या कवितेच्या शब्दांसह त्यांना शब्दांशिवाय फक्त स्वरातच गाण्यास सांगितले गेले. याचे परिणाम अतिशय मनोरंजक असे आहेत.
आपण जितके जास्त उंच गाता तितके अधिक कण सोडले जातील.
P, B, R, T सारख्या अक्षराच्या उच्चारणाद्वारे अधिक सूक्ष्म कण म्हणजेच एरोसोल हे बाहेर सोडले जातात.
हे रिझल्ट्स स्वीडनमधील लुंड विद्यापीठाच्या संशोधनात आढळले, मात्र ब्रिस्टल विद्यापीठातील अशाच एका अन्य संशोधनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला.
गाणे गाण्याच्या दरम्यान श्वसन कण जास्त प्रमाणात सोडले जात नाहीत, तर त्याच पिचवर बोलण्याने बरेच एरोसोल हे बाहेर सोडले जातात.
यातून काय समजू शकते?
या संशोधनातून हे समजले की, कोविड १९ ग्रस्त दोन व्यक्तींच्या संभाषणानंतर लगेचच हवेत ज्यांचा शोध लागला जाऊ शकतो असे फारसे व्हायरस सापडले नाहीत. परंतु संशोधक असेही म्हणत आहेत की, एअरवेज़ आणि त्या व्यक्तीला विषाणूचा कसा त्रास होतो आहे यांवर हे हवेतील विषाणूचा प्रभार अवलंबून आहे. इतकेच नाही तर कोविड १९ व्यक्तीच्या गाण्याने आजूबाजूच्या हवेमध्ये एरोसोलची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर गाण्याचे कार्यक्रम होऊ नयेत?
नाही, असे नाही. संशोधकांनी असे मानले आहे की, या संशोधनाचा अर्थ असा नाही आहे की गायन किंवा गाण्याचे कार्यक्रम थांबवले पाहिजेत. तर, सोशल डिस्टेंसिंगची काळजी घेत, चांगली साफसफाई आणि वेंटिलेशन करून आपण गाणे गाऊ आणि ऐकू देखील शकता, मात्र जर आपण मास्क घातला तर संसर्गाचा धोका आणखीनच कमी होईल.
या संशोधनात यावर देखील जोर देण्यात आला की, गायनाच्या कार्यक्रमात अधिक श्रोते असल्यास वेंटिलेशन देखील चांगले असले पाहिजे, अन्यथा एसी किंवा बंद खोलीसारख्या ठिकाणी मर्यादित हवेमध्ये फिरणे या संक्रमणाच्या धोक्याला वाढवू शकतो. भारतीय तज्ञांनीही या गोष्टी मान्य केलेल्या आहेत.
किती अंतर सुरक्षित आहे?
ईएनटी तज्ज्ञ सर्जन डॉ. सी. शेखर सिंह म्हणतात की,” सामान्यपणे बोलण्याने नाक, तोंड आणि घश्यावर सामान्यपणे दाब पडतो. परंतु मोठ्याने बोलणे, ओरडणे, खोकणे किंवा शिंकणे यामध्ये त्यांवर अधिक जोर दिला जातो. स्नायूंवर अधिक जोर दिल्यास जास्त एरोसोल बाहेर पडतात. म्हणून, मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे महत्वाचे आहे.
दुसरीकडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रमुख डॉ. केके अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, बोलणे, ओरडणे किंवा खोकल्याच्या क्रियेदरम्यान तीन फूट अंतर असणे सुरक्षित नाही, मात्र हे अंतर कमीतकमी सहा फूट असावे. संसर्गाचे एसिम्प्टोमॅटिक कॅरियरांना टाळण्यासाठी, तज्ञ असा सल्ला देत आहेत की, सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलणे, ओरडणे किंवा मोठ्याने हसणे टाळणे केव्हाही चांगले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.