हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | तीन वर्षापासून बंद असलेली ‘व्हेरिफिकेशन प्रोसेस’ म्हणजेच ‘व्हेरिफाईड ब्लू टिक’देण्याची प्रोसेस ट्विटरने नुकतीच सुरु केली आहे. आपण जर ट्विटरने दिलेल्या अकाउंट पर्यायांपैकी एका पर्यायांमध्ये येत असाल. तर आपण ही ब्लू टीक मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी ट्विटरने सेल्फ सर्व एप्लीकेशन सुरू केले आहे. यामार्फत वापरकर्ते व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करू शकतील. How to Apply For Twitter Verification Tick
ट्विटरच्या ‘मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म’ने ही व्हेरिफिकेशन प्रोसेस 16 नोव्हेंबर 2016 पासून थांबली होती. ती आता तब्बल तीन वर्षानंतर 22 जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे. व्हेरिफिकेशन करण्यासाठी वापरकर्त्याच्या अकाऊंटसाठी काही अटी आहेत. सहा अकाउंटचे पर्याय दिलेले आहेत. ते अकाउंट नोटेबल आणि ॲक्टिव असावेत. नोटेबल अकाउंटचे प्रकार खालील प्रमाणे,
– सरकारी
– कंपनी ब्रँड आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन
– न्यूज ऑर्गनायझेशन आणि जर्नलिस्ट
– इंटरटेनमेंट स्पोर्ट्स अँड ई स्पोर्ट्स
– ॲक्टिविस्ट, ऑर्गनायझर आणि व्यक्तिगत वापरकर्ते
आपण या वरील पर्यायांमध्ये मोडत असाल तर अर्ज करावा. सोबतच ट्विटरला अकॅडमिक, सायंटिस्ट आणि धार्मिक लीडर्स या कॅटेगिरी साठी सुद्धा व्हेरीफिकेशन सुरू करण्याच्या सूचना आल्या आहेत. लवकरच त्या अकाउंट साठीही व्हेरिफिकेशन सुरू होण्याची शक्यता आहे. How to Apply For Twitter Verification Tick
तुम्ही वरील पर्यायामध्ये मोडत असाल. आणि तुम्हाला तुमचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड करून घ्यायचे असेल तर, ट्विटरच्या ‘सेल्फ सर्व्ह ॲप्लिकेशन पोर्टल’ वरती जाऊन ‘व्हेरिफाईड स्टेटस’मध्ये जाऊन एका अकाउंट प्रकार सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ‘आयडेंटिटी लिंक’ आणि काही डॉक्युमेंटसाठी विचारणा होईल. त्याची पूर्तता झाल्यानंतर तुमचे अकाउंट व्हेरिफाय होईल आणि तुमच्या नावापुढे ब्लू टीक येईल.