हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सध्या बाजारात Facebook,Instagram, Twiter सारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध आहेत. आजकाल Instagram हे एक शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून हळूहळू लोकप्रिय बनत आहे. यामध्ये युझर्सना Reels आणि Photos बरोबरच डायरेक्ट मसेज आणि कॉलही करता येतात. याशिवाय कंपनीकडून नुकतेच Notes फीचर देखील लाँच करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने लोकांना आता आपल्या मनातल्या गोष्टी शब्दात व्यक्त करता येतील. या नवीन फीचर्समुळे इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली आहे.
हे लक्षात घ्या कि, Meta ची मालकी असलेल्या या प्लॅटफॉर्मकडून युझर्सना प्रायव्हेट आणि पब्लिक अकाउंटचा पर्याय दिला जातो. यामधील पब्लिक अकाउंटला कोणालाही फॉलो करता येते. अशा परिस्थितीत, आपल्याला आवडत नसलेल्या काही लोकांकडून आपली प्रोफाइल फॉलो केली जाण्याची शक्यता असते. Instagram कडून युझर्सना एखादे अकाउंट ब्लॉक करण्याची परवानगी देखील दिली जाते. मात्र, ते नंतर अनब्लॉकही करता येते. यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जाऊन काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
Instagram वर युझरला अशा प्रकारे करा अनब्लॉक
कोणत्याही युझरला अनब्लॉक करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमधील Instagram App उघडा. त्यानंतर उजव्या बाजूच्या तळाशी असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. यानंतर उजव्या बाजूला वरच्या बाजूला दिलेल्या तीन डॉट आयकॉनवर जा. इथे अनेक पर्याय दिसतील. Settings वर क्लिक करा. आता Privacy Option निवडा.
यानंतर खाली स्क्रोल करा, इथे आपल्याला Blocked List चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. आता समोर ब्लॉक केलेल्या कॉन्टॅक्ट्सची लिस्ट येईल. इथे आपल्याला ब्लॉक करायचा असलेल्या कॉन्टॅक्ट समोरील Unblock पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे इन्स्टाग्रामवर कोणालाही सहजपणे अनब्लॉक करता येईल.
Instagram वर युझरला अशा प्रकारे करा ब्लॉक
जर आपल्याला Instagram वर एखाद्या युझरला ब्लॉक करायचे असेल तर त्यासाठी सेटिंग्जमध्ये जाण्याची गरज नाही.त्यासाठी त्या युझरची प्रोफाईल ओपन करा. या नंतर थ्री डॉट आयकॉनवर क्लिक करा. यानंतर ब्लॉक ऑप्शनवर क्लिक करताच ते अकाउंट ब्लॉक होईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.instagram.com/
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त