ऑस्ट्रेलियामध्ये सापडली 14 फूट लांब मगर, वजन आहे 350 किलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या वनविभागाने उत्तरी भागा खाऱ्या पाण्यात राहणारी एक 14 फूट लांब मगर पकडली आहे. या महाकाय मगरीचे वजन 350 किलो आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे प्रसिद्ध असलेल्या एका पर्यटनस्थळावरून या मगरीची सुटका करण्यात आली आहे. कॅथरीनचे वन्य जीवन रेंजर जॉन बुर्के यांनी सांगितले की, या नर मगरीचे वजन 350 किलोपेक्षा जास्त आहे. कॅथरीनच्या आउटबॅक शहरापासून 120 किमी अंतरावर नॅचरल पार्क येथे फ्लोरा नदीत ही मगर पकडली गेली आहे. ते म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी याच भागातील कॅथरीन नदीतून आणखी एक 15.5 फूट लांब मगर पकडली गेली होती.

ऑस्ट्रेलियामध्ये मगरींची शिकार करणे बेकायदेशीर आहे.
1970 च्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या फेडरल सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी कायदा बनविला. ज्यानंतर त्यांची संख्या खूप वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. पहिले येथे मगरीचे चामडे आणि हाडे यासाठी अंधाधुंदपणे शिकार केली गेली. ज्यानंतर सरकारला हे कायदे करण्यास भाग पाडले गेले. मगर एक प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत जे उभयचर आहेत, म्हणजेच ते पाणी आणि जमीन दोन्हीमध्ये राहतात. मगर हा एक धोकादायक मांसाहारी प्राणी आहे जो आपला शिकार थेट गिळतो.

मगरी 40 ते 50 वर्षे जगतात
आफ्रिका, आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या उष्णकटिबंधीय भागात मगर बहुतेकदा आढळतात. मगर हे डायनासोर आणि पक्ष्यांचे दूरचे नातेवाईक मानले जातात. जगभरातील सरपटणाऱ्यां प्राण्यांपैकी ते सर्वात मोठे आहेत. प्रौढ मगरीची लांबी 20 फुटांपेक्षा जास्त असू शकते. त्यांचे वजन सुमारे एक टन असते. मात्र, काही मगरीची लांबी सुमारे 6 फूट आहे. मगरी या दीर्घकाळ जगतात. त्यांचे सरासरी वय 40 ते 50 वर्षे मानले जाते. मगरीचे पंजे जाळीदार आहेत, ज्यामुळे त्यांना पोहणे सोपे जाते. मगरींच्या तोंडात 80 दात असतात आणि आयुष्यात त्यांचे दात 50 वेळा बदलले जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.