हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘मी कच्च्या गुरुचा चेला नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा भाजपला दिला. पंढरपूर-मंगळवडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराप्रत्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आज पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी आज प्रचारसभेत लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
मंत्री मुंडे म्हणाले, आजचा दिवस माझ्या आयुष्यात का यावा? पंढरपूरच्या पांडुरंगाला मी प्रश्न विचारतो. माझ्या जीवनातील सर्वात मोठी सभा नानांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळीच मी संगितलं होतं, नाना हॅट्रिक करणार ते. नानांचं आणि माझं नातं हे वडील-मुलाचं होतं. मी आशीर्वाद द्यायला नाही. तर भगीरथसाठी आशीर्वाद मागायला अलोय. भाजपने इथलं राजकारण खालच्या पातळीवर नेले आहे. पोटनिवडणूक लागल्यावर विरोधात उमेदवार देण्याचं पाप यांनी केलं. लाखोंच्या संख्येने कोरोनाचे पेशंट समोर येतायत. अशा परिस्थितीत ही निवडणूक लागायला नको होती. वारकरी संप्रदायात या गावाचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे 17 तारखेला वळवळ करणाऱ्याला चांगलं रिंगण दाखवायचं आहे.
मी कच्च्या गुरुचा चेला नाही. कोणाचीही पावसात सभा झाली की यांची धसकी भरते. मी कासेगावच्या सभेत सांगितले होते, मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका. पण नाद केल्याशिवाय त्यांना रहावत नाही. टिका करायचे विरोधकांचे काम आहे. लोकशाहीचा आदर करणारे आम्ही कार्यकर्ते, आम्हाला लोकशाही शिकवता. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं पवार साहेबांनी करुन दाखवलं.