“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. अश्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही आणि ते उपमुख्यमंत्री होतील, हे आधीपासूनच ठरलं होतं का? याची चर्चा रंगली असताना त्यातच याबाबत आपल्याला आधीपासूनच माहिती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी सांगितले आहे. ”मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात”, असे अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) म्हणाल्या आहेत.

“वेश बदलून भेटी व्हायच्या”
एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात भाषण करताना रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांसोबत गाठीभेटी व्हायच्या. कुणी उठायच्या आत आम्ही आपापल्या घरी असायचो, असं सांगितलं. त्यांच्या या विधानाला अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. “देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातला की ते मलाही ओळखू यायचे नाही”, असे अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी म्हटले आहे.

“देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक”
“देवेंद्रजींना कायम महाराष्ट्राची सेवा करायला आवडतं ते कायम तेच काम करत आले आहेत. याआधी ते आमदार असताना, त्यानंतर मुख्यमंत्री असताना, विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कायम जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला. आता ते सत्तेत आलेत तर ते आताही जनतेच्या सेवेसाठी कायम कार्यरत असतील याचा मला विश्वास आहे. एकनाथ शिंदेदेखील 24 तास जनतेच्या सेवेसाठी तयार असतात. त्यामुळे हे दोघे मिळून जरूर महाराष्ट्र हिताची कामं करतील, याची मला खात्री आहे”, असे देखील अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा :
‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, घटना CCTVमध्ये कैद

Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!!

कोचिंग क्लासमधील शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!

Leave a Comment