‘मी पुन्हा येईन’; योगी आदित्यनाथांचा फडणवीसांच्या सुरात सूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत वातावरण तापलं असून सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश मध्ये सध्या भाजपचे सरकार असून पुन्हा एकदा भाजपच बाजी मारेल असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला तसेच मी पुन्हा येईल असं म्हणत पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशच्या राजकारणात ३५ वर्षांच्या काळात कोणताही मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आला नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर योगींनी म्हटलं आहे की, मी पुन्हा येईन.. आम्ही रेकॉर्ड तोडायलाच आलो असल्याचे म्हटलं आहे. तसेच भाजपला ३५० जागांपेक्षा एकही कमी जागा मिळणार नाहीत असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

भाजपची जोरदार तयारी-

युपीतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता योगी सरकारने जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात योगी सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यात येत आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांना मानधन आणि प्रोत्साहनपर भत्त म्हणून महिन्याला १५०० रुपये, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्यांना १२५० रुपये आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ७५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.