सुरेखा पुणेकरांनी बांधले घड्याळ; अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुरेखा पुणेकरांसह देवयानी बंद्रे यांनी देखील राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे.

‘मी आतापर्यंत कलेची सेवा केली. आता मला राजकारणात प्रवेश करून जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे, गोरगरीबांचे प्रश्न सोडवायचे आहेत.’ त्यामुळे आज सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे असेही त्यांनी म्हंटल.

सुरेखा पुणेकरांचे प्रवीण दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर

सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष असल्याची टीका केली होती त्याचाही त्यांनी समाचार घेतला. ‘दरेकरांचं फार चुकलं. तुम्ही महिलांना संरक्षण, मान देऊ शकत नाही. तर निदान बोलू तरी नका ना. आज जर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला पेटल्या तर काय होईल, म्हणून अशी विधान कुठे करू नका असा इशारा त्यांनी दिला.

You might also like