वायनाड (केरळ) | प्रियंका गांधी यांचे नाव कॉंग्रेसच्या वाराणसी मधील उमेदवार म्हणून अनेकदा चर्चेत आले आहे. तेथील कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या उमेदवारी बाबत आग्रही आहेत असे बोलले जाते. मात्र वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी करण्याबाबत स्वत प्रियंका गांधी यांनी आपले वक्तव्य दिले आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी मला जर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर मी निवडणुका तयार आहे असे वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केले आहे. त्या वायनाड दौऱ्यावर आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Priyanka Gandhi Vadra on being asked if she will be contesting from Varanasi: If Congress President asks me to contest, I will be happy to contest. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/rbMagjccOF
— ANI (@ANI) April 21, 2019
जम्मू -काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व्ही.व्ही वसंत कुमार यांच्या राहत्या घरी जावून प्रियंकागांधी यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वाराणसी मधून निवडणूक लढवण्या बाबत भाकीत केले आहे.