नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात 18 ते 22 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. आज आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले सर्वात यशस्वी बॉलर कोण आहेत त्यांची माहिती घेणार आहे.
१. पॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया )
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर पॅट कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 70 विकेट घेतल्या आहेत.
२. स्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड )
दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड आहे. त्याने 17 सामन्यांमध्ये 69 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये दोनवेळा इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेटचा समावेश आहे. तर एका मॅचमध्ये १० विकेटदेखील घेतल्या आहेत.
३. आर.अश्विन ( भारत)
तिसऱ्या क्रमांकावर भारताचा स्पिनर आर.अश्विन आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 67 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने चारवेळा इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
४. नॅथन लायन ( ऑस्ट्रेलिया )
चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नॅथन लायन आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 56 विकेट घेतल्या आहेत. लायनला चारवेळा इनिंगमध्ये पाच विकेट मिळाल्या, तर एकवेळा त्याने मॅचमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
५. टीम साऊदी ( न्यूझीलंड)
पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदी याचा नंबर लागतो. त्याने 10 मॅचमध्ये 51 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने तीनवेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.