कुंभमेळा टूलकिट प्रकरणात रामदेवबाबांची उडी म्हणाले, हिंदूंचा अपमान करु नका हा देश तुम्हाला माफ करणार नाही

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढण्यासाठी आटोपाकाट प्रयत्न करीत आहे. मात्र अशातच देशात सध्या नव्या टूलकिट प्रकरणी जोरदार चर्चा सुरु आहे. यावरूनच योगगुरू रामदेव बाबा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हंटले आहे की,” टूलकिटद्वारे कुंभमेळा व हिंदू धर्माची बदनामी करणे हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय षडयंत्र व गुन्हा आहे. मी हे करीत असलेल्या लोकांना विनंती करतो की ते राजकारण करू शकतात परंतु हिंदूंचा अपमान करु नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही. मी लोकांना अशा शक्तींचा बहिष्कार घालण्यास व विरोध करण्याचे आवाहन करीत आहे” अशी प्रतिक्रिया योगगुरू रामदेव बाबा यांनी दिली आहे.

काय आहे टूलकिट प्रकरण ?

कुंभ मेळा २०२१ च्या टूलकिट प्रकरणावरून राजकारणही शिगेला पोहोचले असून त्यामुळे देशातील नव्या टूलकिटवरील चर्चा तीव्र होत आहे. या ‘टूलकिट’ किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या पृष्ठांवर कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे हे मार्गदर्शक स्वत: कॉंग्रेस कमांडने जारी केल्याचे मानले जाते. या दस्तऐवजाला भाजप नेते व प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विट केले आहे.सोशल मीडिया आणि मीडियामध्ये आता ही चर्चा तीव्र झाली आहे.

या ‘टूलकिट’मध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की कॉंग्रेस सर्व कार्यकर्त्यांना ईदच्या मेळाव्याबाबत मौन बाळगण्याचे निर्देश देत असून कुंभमेळ्याला’ सुपर स्प्रेडर ‘म्हणून सांगायला सांगत आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते ईदशी संबंधित कोणत्याही पोस्टवर भाष्य करू नये नाहीत किंवा शेअरही करू नये. पण प्रत्येक माध्यमात आंतरराष्ट्रीय माध्यमात छापलेल्या कुंभमेळ्याला विरोध करणारे लेख शेअर करा. असेही लिहिले गेले होते की, इतके विनाश करण्याचे कारण म्हणजे भाजपाचे हिंदू राजकारण आहे. यासाठी कॉंग्रेस पक्षाने बीबीसीच्या “India Covid: Kumbh Mela Pilgrims turn into super-spreader” हा लेख सामायिक करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा अनुवाद “कुंभमेळ्याला आलेल्या पर्यटक” सुपर-स्प्रेडरमध्ये बदलला आहे. असा होतो.
आता या नव्या टूलकिट प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले असून याबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील यात उडी घेतली असून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

You might also like