हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी 50,000 किंवा त्याहून अधिक किंमतीच्या सर्व चेकसाठी ‘पॉझिटिव्ह पे’ सिस्टम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिस्टम देशभरात जारी केलेल्या एकूण चेकपैकी 20% वॉल्यूम कवर करेल आणि 80% व्यवहार मूल्याच्या आधारे चेक द्वारे दिली जाईल. खाजगी सेक्टर बँक, ICICI बँकेने 2016 मध्येच ही सुविधा सुरू केली.
पॉझिटिव्ह पे ‘ सिस्टम कसे कार्य करते?
या ‘पॉझिटिव्ह पे ‘ सिस्टम अंतर्गत आता खातेधारकाला 50,000 किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक देताना बँकेला चेक बद्दल माहिती द्यावी लागेल. यासाठी खातेधारकास चेकचा पुढचा आणि मागचा फोटो चेक क्रमांक, चेक देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, रक्कम इत्यादी तपशिलासह शेअर करावा लागेल. जेव्हा लाभार्थी बँकेस एनकेस करण्यासाठी चेक सादर करतो तेव्हा बँक चेकच्या डिटेल्स सह ‘पॉझिटिव्ह पे ‘ सिस्टम द्वारे आधीपासून मिळालेल्या डिटेल्सशी मॅच करेल. डिटेल्स जुळल्यानंतरच चेक क्लियर केला जाईल. हे चेकशी संबंधित फसवणूकिला रोखण्यास मदत करेल.
ICICI बँकेत ‘पॉझिटिव्ह पे ‘ सिस्टमची सुविधा
नव्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये ‘पॉझिटिव्ह पे ‘ सिस्टम लागू करण्यासाठी आरबीआयने पुढाकार घेतला आहे, तर आयसीआयसीआय बँक ही सेवा 2016 पासूनच आपल्या ग्राहकांना देत आहे. आयसीआयसीआय बॅंकेचे ग्राहक त्याला iMobile या अॅपवर अॅक्सेस करू शकतात आणि चेक लाभार्थीस देण्यापूर्वी चेक क्रमांक, तारीख, पैसे देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, रक्कम आणि चेकचा पुढचा आणि मागचा फोटो घेऊ शकतात.
लाभार्थीच्या बँकेत जेव्हा क्लियरिंगसाठी चेकचा फोटो येतो तेव्हा ते आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनी iMobile अॅप्लिकेशनद्वारे प्रदान केलेल्या डिटेल्सशी मॅच केले जाते. जर डिटेल्स जुळत असेल तरच चेक क्लियर केला जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.