ICICI Bank FD Rates : देशातील प्रसिद्ध राष्ट्रीय बँक असलेल्या ICICI ने आपल्या मुदत ठेवींच्या दरांमध्ये वाढ केली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर बँकेने वाढवले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेने एकाच आठवड्यात दोन वेळा व्याजदर वाढवले आहेत त्यामुळे ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. हे नवे दर १७ फेब्रुवारी पासून लागू होतील. त्यामुळे बँकेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर म्हणावी लागेल. नवीन एफडी दरांची माहिती बँकेने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.
ICICI बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना 3% ते 7.20% पर्यंत व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याज दर 3.50% ते 7.75% पर्यंत आहे. दुसरीकडे, 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर सामान्य नागरिकांना 4.75% ते 7.40% पर्यंत व्याज बँकेकडून मिळत आहे. बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.75% व्याज देण्यात येत आहे तर सर्वसामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त 7. 2% व्याज मिळत आहे. (ICICI Bank FD Rates)
कोणत्या ठेवीवर किती व्याज वाढले – ICICI Bank FD Rates
बँकेने आता बदललेल्या व्याजदरानुसार, 17 फेब्रुवारीपासून गुंतवणूकदारांना 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज मिळणार आहे. तर 15 ते 29 दिवसांच्या FD साठी गुंतवणूकदारांना 3 टक्के व्याज मिळेल. 30 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी, FD वर 3.5 टक्के व्याज दिले जाईल, 46 दिवस ते 60 दिवसांच्या कालावधीसाठी, FD वर 4.25 टक्के व्याज मिळेल तर 61 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी, 4.5 टक्के व्याज दिले जाईल. याशिवाय 91 दिवस ते 184 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के, 185 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.75 टक्के, 271 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6 टक्के, एक वर्ष ते 15 महिन्यांच्या एफडीवर 6.7 टक्के व्याज मिळेल.15 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 7.2 टक्के व्याज तर 2 वर्षांहून अधिक आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 7 टक्के, 5 वर्षांच्या करबचत एफडीसाठी 7 टक्के आणि 5 ते 10 वर्षांसाठी 6.9 टक्के व्याजदर दिला जात आहे.